Chinchwad News: श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महोत्सवात 376 जणांची मोफत नेत्र तपासणी

एमपीसी न्यूज – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात कोरोना कालावधीत देखील खंड न पाडता दरवर्षीप्रमाणे मोफत नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप  शिबिर घेण्यात आले. यामध्ये 376 जणांची तपासणी करण्यात आली. तर, आर्थिक दुर्बल घटकातील 217 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीमुळे यंदा श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान रद्द केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, रक्तदान, नेत्रतपासणी शिबिरात खंड पडू दिला नाही. यंदा या दोन्ही शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

या महोत्सवात अश्विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे यांच्या माध्यमातून दरवर्षी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येते. 2004 पासून अखंडपणे हे शिबिर सुरु आहे. यंदा कोरोना कालावधीत देखील शिबिर पार पडले. यामध्ये 376 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर, आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील 217 जणांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ महाराज देव, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे उपस्थित होते. तर, खासदार श्रीरंग बारणे यांनी शिबिराला भेट दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.