Chinchwad News : संवाद युवा प्रतिष्ठान तर्फे गरजू नागरिक व बॅचलर मुला- मुलींसाठी निशुल्क अन्नछत्र

एमपीसी न्यूज – संवाद युवा प्रतिष्ठान तर्फे गरजू नागरिक व बॅचलर मुला- मुलींसाठी निःशुल्क ‘अन्नपूर्णा’ अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. संवाद संदस्यांच्या स्वखर्चातून हा उपक्रम सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_II

कामानिमित्त शहरात आलेल्या गरजू कामगार व बॅचलर मुलं- मुली यांना लॉकडाऊनमुळे जेवणाची गैरसोय होत आहे. त्यामुळे संवाद युवा प्रतिष्ठान तर्फे चिंचवडे नगर प्रभागात निःशुल्क अन्नछत्र सुरू करण्यात आले. 23 एप्रिलपासून एक वेळ (फक्त सायंकाळी) गरजूंना निःशुल्क अन्न वाटप केले जात आहे.

संवाद प्रतिष्ठानचे प्रदिप पटेल, माऊली जगताप, रविंद्र कुंवर, राजेंद्र निकम, रामचंद्र पाटील, संदिप पाटील, मोतीलाल पाटील, प्रल्हाद पाटील, गौतम बागुल यांच्या सहकार्याने लॉकडाऊन संपेपर्यंत सुरु हा उपक्रम सुरू ठेवला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.