Chinchwad news : मोहननगर येथे शिवजयंतीनिमित्त 100 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

एमपीसीन्यूज : अखिल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोहननगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्टार हाॅस्पिटल व स्वास्थ मेडीकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिरात शंभर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

मोहननगर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पुजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, मनसे शहर उपाध्यक्ष दत्ता देवतरासे, सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे, संजय जगताप , गणेश दातीर पाटील, संदिप बामणे, राहुल दातीर पाटील, कामगार नेते किरण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस नेते विशाल काळभोर, शिवसेना महिलाप्रमुख माधुरी पाटील, शिवसेना विभागप्रमुख सोमनाथ अलंकार, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर, सुदेश चव्हाण, अविनाश गायकवाड, मंगेश थोरात, अभिजित वेंगुर्लेकर , सुरज मिर्गे, सुरज कावळे व परिसरातील महिला, युवक उपस्थित होते.

स्टार हाॅस्पिटल सौजन्याने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ आरोग्य कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी घेतला. यात 100  नागरिकांची तपासणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.