Chinchwad News : जे. के. सुपर सिमेंट कंपनीकडून पोलीस आयुक्तालयासाठी 75 बॅरिकेट्सची मदत

वाकड पोलिसांच्या प्रयत्नातून मिळाले बॅरिकेट्स

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांच्या प्रयत्नातून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी 75 बॅरिकेट्सची मदत घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये नाकाबंदी करण्यासाठी या बॅरिकेट्सची पोलिसांना मदत होणार आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत राज्यभर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात येत आहे. या नाकाबंदीसाठी आवश्यक असलेले बॅरिकेट्स हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने नाकाबंदी करण्यासाठी पोलिसांना अडचणी येत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बॅरिकेट्स प्रायोजकांशी संपर्क करून बॅरिकेट्स उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील यांनी जे. के. सिमेंट या कंपनीशी संपर्क करुन बॅरिकेट्सची अडचण त्यांना सांगितली.

कंपनीने सामाजिक भावनेतून त्यांच्या वरिष्ठांकडून परवानगी घेऊन तात्काळ वाकड पोलिसांना 25 बॅरिकेट्सची मदत केली. अपर पोलीस पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 2) आनंद भोईटे यांच्या पूर्व मान्यतेने सहाय्यक पोलीस आयुक्त (वाकड विभाग) श्रीकांत डिसले यांच्या उपस्थितीत जे. के. सिमेंट कंपनीचे दक्षिण भारत ब्रँडींग ऑफिसर अभय पुजारी यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे 25 बॅरिकेट्स वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे यांच्याकडे हस्तांतरित केले.

जे. के. सिमेंट कंपनीने अशाच प्रकारे निगडी वाहतूक विभागाला 25 आणि तळवडे वाहतूक विभागाला 25 बॅरिकेट्सची मदत केली आहे. कंपनीने आयुक्तालयासाठी एकूण 75 बॅरिकेट्सची मदत केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.