Chinchwad News: कोरोनामुळे गवळी समाजाचा ‘सगर’ उत्सव रद्द

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील लिंगायत गवळी समाज्याच्या वतीने दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या निंमित्ताने साजरा करण्यात येणारा ‘सगर उत्सव’ रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव रद्द केल्याचे लिंगायत गवळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी सांगितले.

चिंचवड येथील लिंगायत गवळी समाज्याच्या वतीने दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ‘सगर उत्सव ‘हा पारंपरिक उत्सव म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. दिवाळी पाडव्या दिवशी गाई, म्हशी, रेडे, यांना रंगरंगोटी करून अंगावर नक्षी काढून झूल टाकून अंगावर गुलाल, भंडारा टाकून सजवण्यात येते. समाज्यातील पंच मंडळींनी स्थापन केलेल्या, ‘सागरा’वर मिरवणुकीने वाजत गाजत नेण्यात येते. या ठिकाणी म्हशी व रेडे पळविण्याची स्पर्धा होते.

प्रत्येक समाज बांधव आपल्याकडील म्हशी, रेडे सागरावर घेऊन येतात. हा उत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करतात. या उत्सवाचा आनंद घेतात. परंतु, यावर्षी कोरोनाचे संकट असून उत्सव साजरा करण्यास पोलीस प्रशासन परवानगी देत नाही. त्यामुळे या वर्षी दिवाळी पाडाव्यानिमित्त होत असलेला ‘सगर उत्सव ‘रद्द करण्याचा निर्णय पंचांकडून घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.