Chinchwad News : उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने सांगवी पोलीस ठाण्यातील कोरोना योद्धयांचा गौरव

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीच्या काळात पोलिस प्रशासन हे आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कार्यरत आहेत. त्यामुळे या कोरोना योद्धयांचा सन्मान केला पाहिजे, या भावनेने भाजपा चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा कुंदा भिसे व उन्नति सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्यावतीने पोलिस कोरोना योद्धयांचा सन्मान करण्यात आला.

सांगवी पोलीस ठाण्याच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला.  अतुल पाटील, शैलेष बासुतकर, विकास काटे, शाम कुंजीर, महेश गवस, विवेक भिसे, ऋषिकेश होणे, अनिकेत फुरंगे, अँड. मुक्ता खानदेशी, सोनाली शिंपी व इतर महिला पोलिस अधीकारी व मान्यवर उपस्थित होते.

पोलिस निरिक्षक रंगनाथ उंडे, उपनिरीक्षक अजय भोसले यांनी भिसे दाम्पत्याचे कौतुक केले. उन्नति सोशल फाउंडेशनचे कार्य नेहमी समाजपयोगी व कौतुकास्पद असे, असे गौरवोद्गारही रंगनाथ उंडे यांनी काढले.

कुंदा भिसे म्हणाल्या, कोरोना संकट काळात डॉक्टर आणि सफारी कामगार कार्यरत होते तसेच कोरोना महामारीच्या काळात पोलिस प्रशासन हे सुद्धा जनतेच्या रक्षणासाठी व सुरक्षतेसाठी अहोरात्र कार्यरत होत. कोरोना काळात पोलिस प्रशासनाकडून जनतेसाठी खुप मोठी मदत झाली. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.