Chinchwad News: चिंचवडगावात महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – चिंचवडगावातील नवनिर्माण काचपत्रा कष्टकरी संघ यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून संघातील कचरा वेचक, सफाई कामगार, घंटागाडीवरील सफाई महिला कामगारांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली सोशल फाउंडेशनद्वारा आयोजित जागर स्त्री शक्तीचा, सन्मान मातृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन निंबाळकर आणि ज्योती निंबाळकर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्याध्यक्ष पुष्पा शेळके, संगिता कोकणे , नवनिर्माण काचपत्रा कष्टकरी संघाच्या सचिव सोनाली कुंजीर, अश्विनी गायसमुद्रे, पोर्णिमा पालेकर, भारती कदम, सुवर्णा वाळके, स्वप्नाली आसोले, उषा चिंचवडे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मोठ मोठ्या मान्यवर महिलांना सन्मानित केले जाते. परंतु, ख-या अर्थाने आज अहोरात्र कष्ट करणाऱ्या, स्वत:च्या कुटुंबासाठी झटणा-या आणि कोरोना कालावधीत सुध्दा न डगमगता समाजाची सेवा करणा-या कष्टकरी महिलांचा सन्मान साडी चोळी देऊन करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.