Chinchwad News : बंदी असताना हाॅटेलमध्ये ग्राहकांना जेवण व दारु पुरवणा-या हाॅटेल मालक व मॅनेजरला अटक 

एमपीसी न्यूज – हाॅटेलमध्ये ग्राहक बसवून जेवण करण्याची परवानगी नसताना गर्दी करुन ग्राहकांना जेवण व दारु आणि बिअर देणा-या हाॅटेल मालक व मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच 35 ग्राहक व पाच वेटर यांच्याकडून 20 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वाल्हेकरवाडी येथील चंद्रमा हाॅटेलवर गुरुवारी (दि.1) हि कारवाई करण्यात आली.‌

याप्रकरणी हाॅटेल मालक मयुर बाळासाहेब बोडके (वय 30, रा. तापकीर नगर, काळेवाडी) हाॅटेल मॅनेजर विनायक विलास कांजोळे (वय 24, रा. आकुर्डी निगडी ) तसेच अश्विन कुमार चौबे (वय 32, आहेर मंगल कार्यालय, वाल्हेकर वाडी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक योगेश बालाजी तिडके यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील चंद्रमा हाॅटेलचे मालक व मॅनेजर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पार्सल सुविधा पुरविणे बंधनकारक असताना त्यांनी ग्राहकांना चंद्रमा हॉटेलमध्ये बसण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. तसेच त्यांना खाद्य पदार्थ पुरविले व दारु विक्रीचा परवाना नसताना ग्राहकांना 25 हजार 570 रुपयांची दारु व बिअर पुरवली.

हाॅटेल मालक व मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच 35 ग्राहक व पाच वेटर यांच्याकडून 20 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.