Chinchwad News : आवाहन करूनही नदीत विसर्जन, तीनशेहून अधिक मूर्तीं काढल्या बाहेर

एमपीसी न्यूज – पर्यावरणपूरक गणशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या दुष्टीकोनातून गणेश विसर्जन प्रामुख्याने घरातच किंवा पर्यायी व्यवस्था केलेल्या कृत्रिम हौदातच करावे असे आवाहन पालिकेने केले होते. पण, अनेक गणेशभक्तांनी आवाहनाला डावलून नदीत गणेश विसर्जन केले. पवना नदीत विसर्जित केलेल्या तीनशेहून अधिक गणेश मूर्तीं सामाजिक संस्थांनी बाहेर काढल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नदीपात्रात मुर्ती विसर्जन करु नये यासाठी पर्यायी व्यवस्था उभारली होती. त्यासाठी 107 ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौद तयार करण्यात आले होते. तसेच अनेक सामाजिक संस्थानी देखील मूर्ती संकलनासाठी पुढाकार घेतला होता. गणेश विसर्जनासाठी नदी घाटावर बंदी घातली होती तरीही अनेक गणेशभक्तांनी पवना नदीत गणेश मूर्तींचे बेशिस्तपणे विसर्जन केले तसेच, निर्माल्य देखील नदीपात्रात फेकून दिले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निसर्ग मित्र, ओरिएंटल मार्वल सोसायटीचे सदस्य, संघाचे स्वयंसेवक, इंडो अ‍ॅथलेटीक सोसायटीचे सायकलपटू व अन्य पर्यावरण मित्रांनी पुढाकार घेत नदीपात्रात विसर्जित केलेल्या गणेश मूर्तीं आणि निर्माल्य बाहेर काढले. तीनशेहून अधिक गणेश मूर्ती यावेळी बाहेर काढण्यात आल्या.

‘या मोहीमेत सामाजिक संस्थांचे 35 आणि पालिकेचे 12 स्वच्छता सेवक यामध्ये सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड महानगपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचारी ट्रकमधून विसर्जनासाठी या मूर्ती घेऊन गेले,’ स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.