Chinchwad News : प्रतिभा महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात

एमपीसी न्यूज – कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’मध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. प्रा. विजय लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे महत्त्व सांगत मराठी लोकसाहित्यातील लोकगितांविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, सी.ए.ओ.डॉ राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजेंद्र लाखे यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन केले. कला शाखा विभाग प्रमुख डॉ. रूपा शहा व सहकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला.

प्रास्ताविक उपप्राचार्या डॉ .वनिता कुऱ्हाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. देवांगी कुलकर्णी यांनी केले व मराठी विभाग प्रमुख प्रा. सुरेखा कुंभार यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.