
Chinchwad News: विद्यानगरमध्ये पोलिसांची गस्त वाढवा, ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसावा – अनुराधा गोरखे

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील विद्यानगर – दत्तनगर भागांमध्ये भरदिवसा खून झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे त्वरित बसवावेत, अशी मागणी भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली आहे.


याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका गोरखे यांनी म्हटले आहे की, चिंचवड येथील विद्यानगर दत्तनगर भागांमध्ये दोनदिवांसूर्वी खुनाची घटना घडली आहे. या हल्ल्यातील दोषीना त्वरित पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
या भागांमध्ये अशा प्रकारच्या घटना वांरवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. त्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. पोलिसांची गस्त वाढवावी, अशी विनंती गोरखे यांनी दोनही आयुक्तांकडे केली आहे.
