Chinchwad News : समान हक्काची जाणीव करून देणारे भारतीय संविधान – डॉ . दीपक शहा

एमपीसी न्यूज – सर्व भारतीयांना समान हक्काची जाणीव करून देणारे भारतीय संविधान आहे असे उद्गार डॉ. दीपक शहा यांनी काढले. संविधान दिनानिमित्त चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या निर्देशानुसार भारतीय संविधान दिनाच्या निमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संस्थेच्या एमबीए विभागाचे संचालक डॉ . सचिन बोरगांवे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सुमित बागल, समवेत प्राध्यापक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना कमला शिक्षण संकूलाचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा म्हणाले, आपल्या संविधानात भारतातील नागरिकांना त्याचे मुलभूत हक्क आणि अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केले आहेत. सर्व भारतीयांना समान हक्काची जाणीव करून देणारे भारतीय संविधान आहे‌. देशाला उज्वल करण्यासाठी समाजातील वाईट प्रथा रोखण्याकरिता सामुहीकरित्या प्रयत्न करण्याची गरज असून, यासाठी तरुणानी पुढाकार ध्यावा असे आवाहन त्यांनी केले.

मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी डॉ. महिमा सिंग यांनी संविधान वाचन व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी केले, संचालक डॉ . सचिन बोरगांवे यांनी मनोगत व्यक्त केले तर, सुमित बागल यांनी आभार मानले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.