Chinchwad News : मेडिकल गॅस पाईपलाईनच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करा – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मेडिकल गॅस पाईपलाईनच्या निविदा क्र. 43/2020/21 मधील अनियमिततेबाबत भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रश्न उपस्थित केला असून याबाबत आयुक्तांना निवेदनही दिले आहे.

तसेच या निवेदनात विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेऊन निविदा प्रक्रिया राबविल्याचा केला संशय वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने जिजामाता पिंपरी, भोसरी नवीन रुग्णालय, थेरगाव हॉस्पिटल व आकुर्डी हॉस्पिटलमध्ये मेडिकल गॅस पाईपलाईनच्या कामाकरिता निविदा र.रु 26,61,18,947/- करिता मागवण्यात आल्या आहेत  त्यामध्ये मोठया प्रमाणात अनियमितता आढळून येतात व सदर निविदा प्रक्रिया ठराविक पुरवठादार व कंपनीला डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

जसे पान क्र .3 C Principal or Original equipment manufacturer should have direct presence and after sales service center  in india since last 5 years from date of publishing this tender & proof should be submitted in technical bid असं म्हणलेलं आहे ही अट फक्त Atlas Copco कंपनीला डोळ्यासमोर ठेवून टाकलेली दिसून येते कारण पुण्यामध्ये त्या कंपनीचे manufacturing Unit आहे.

वास्तविक पाहता CVC गाईडलाईन मध्ये जास्तीत जास्त स्पर्धा होण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीचे टेंडर मागवताना जास्तीत जास्त पुरवठादार निविदा प्रक्रियेत भाग घ्यावेत व निकोप स्पर्धा होऊन वाजवी दरात उच्च प्रतीची सिस्टिम खरेदी करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश असताना अशा पध्दतीने Restricted टेंडर काढण्याचे प्रयोजन कळत नाही.

तसेच निविदेत भाग घेणाऱ्या निविदाकाराचा अनुभव व आर्थिक उलाढाल लक्षात घेण्याऐवजी  उत्पादित कंपनीच्या आर्थिक उलाढाल व अशा प्रकारच्या कामाचा अनुभव मागवण्यात आला आहे याचा अर्थ ज्या निविदाकराकडे निविदेतील नमूद करण्यात आलेल्या कामाचा अनुभव नसताना त्यांना निविदेत पात्र करून तांत्रिक बाबींचा आधार घेऊन अनुभवी निविदकारांना अपात्र ठरवून एकाच कंपनीचे Authorization 3-4 निविदकाराच्या नावे घेऊन फिरवून सिंगल टेंडर करण्यासाठी हा सर्व प्रपंच करण्यात आलेला दिसून येत आहे.

तरी या बाबींचा विचार करून यासर्व अनियमितता होण्याकरिता डॉ. साळवी भांडार अधिकारी चितळे साहेब कारणीभूतआहेत. तसेच या निविदेच्या प्री बीड बैठकीत या निविदेत असलेल्या अनियमितता व ठराविक पुरवठादार यांना डोळ्यासमोर ठेऊन त्यांना अनुकूल केलेल्या अटी व शर्तीवर बाहेरून आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींनी हरकत घेतली आहे आपण त्यावर निःपक्षपाती निर्णय घेऊन आयुक्तांनी निविदा प्रक्रिया पारदर्शक पणे पार पाडावी, अशी मागणीही वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.