Chinchwad News: सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – अहिंसेचे काटेकोरपणे पालन करणारा जैन समाज उद्योग, व्यवसाय, व्यापारात ज्याप्रमाणे अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

जैन सोशल ग्रुप पिंपरी-चिंचवड शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक नाना काटे, जयश्री गावडे, विजय जगताप, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, डॉ. अशोक पगारिया, रमणलाल लुंकड, दिलीप सोनिगरा, राहुल मुनोत, राजेंद्र धोका, सतीश खाबिया, डॉ सुहास लुंकड, राजेंद्र चोरडिया आदी उपस्थित होते.

यावेळी खा. श्रीरंग बारणे उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाले की, संत, महात्म्यांनी सांगितलेल्या विश्वातील सर्व प्राणीमात्रांचे कल्याण होण्यासाठी सांगितलेल्या मार्गावर चालणारा जैन धर्म. मनुष्य, प्राणी व वनस्पती या सर्व स‍जीवांमध्ये आत्मा आहे. या प्रत्येकाला समान वागणूक दिली पाहिजे हि संत महात्म्यांची शिकवण जैन धर्मिय आचरणात आणतात. सेवाभावी वृत्ती, दान आणि परोपकार हे जैन बंधू भगिनींचे सद्‌गुण इतरांना प्रेरणादायी आहेत. यावेळी विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.