Chinchwad News : जतनबाई कोठारी यांचे निधन

0

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील जतनबाई कुन्दन्मल कोठारी (वय 82) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

_MPC_DIR_MPU_II

जैन विद्या प्रसारक मंडळाच्या जैन बाठिया प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून त्यांनी 29 वर्षे सेवा केली. ‘कोठारीबाई’ या नावाने त्या परिचित होत्या. अभिनेते प्रशांत दामले, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजूभाऊ गोलांडे, संजय गावडे यासारख्या प्रतिष्ठित व्यक्ती प्राथमिक शाळेतील कोठारीबाई यांचे विद्यार्थी होते.

गेंदीबाई चोपडा शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका छाया कोठारी-कांकरिया यांच्या त्या आई होत. प्रतिभा महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया हे त्यांचे जावई होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment