Chinchwad News : जयप्रभा चिलेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांच्या मातोश्री जयप्रभा माधव चिलेकर (वय 75) यांचे शनिवारी (दि.2) मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात जयप्रभा चिलेकर यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी रात्री 12.15 त्यांची प्राणजोत मालवली. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अंत्यविधी झाला. यावेळी राजकीय, सामाजिक, पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.