Chinchwad News : पूर्णानगर विकास समितीच्या वतीने पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

प्रमाणपत्र, आर्सेनिक 30 टॅबलेट, मास्क, सॅनिटायझर आणि डायरी, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

एमपीसीन्यूज : चिंचवड येथील पूर्णानगर विकास समितीच्या वतीने कोरोना सारख्या महामारीच्या संकटात कार्यरत असलेल्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला.

कोरोना संकटात विविध रिपब्लिकन युवा मोर्चाचे शहर सचिव अमोल डंबाळे तसेच मानवाधिकार महासंघाचे शहर सचिव रोहित भागवत यांनी अनेक नागरिकांना घरपोहोच जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.

त्याचबरोबर पत्रकार रमेश कांबळे आणि गोविंद बर्गे यांनीही वार्तांकन करुन कोरोनाविषयीची माहिती जनतेपर्यंत पोहचवली

त्यासाठी पूर्णानगर विकास समितीच्या वतीने संस्थेचे संस्थापक विकास गर्ग आणि अध्यक्ष संभाजी बालघरे, विनोद रोकडे यांच्या हस्ते त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात केला. प्रमाणपत्र, आर्सेनिक 30 टॅबलेट, मास्क, सॅनिटायझर आणि डायरी, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गर्ग आणि बालघरे यांनी कोरोना योद्धयांचा कार्याचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.