Chinchwad News: पदवीधरच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या शहरात

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या (बुधवारी) शहरात येणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे बुधवारी सकाळी दहा वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे. महापौर उषा ढोरे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पालिकेचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1