Chinchwad news: सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. 19 मधील चिंचवडच्या श्रीधरनगर परिसरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) पार पडले.

या कार्यक्रमास नगरसदस्य शितल शिंदे, शैलेश मोरे, नगरसदस्या जयश्री गावडे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, उपअभियंता संजय खरात, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे, महेश कुलकर्णी, विलास लांडगे, अजय भंडारी, कडेकर, महेश धोका, दिलीप चोरडीया, मुकुंद जोशी, भूषण देसाई, अनिल नहार, भारतमाता सत्संग मंडळ व श्रीधरनगर युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि मजबूतीकरण करण्यात येणार आहे. दुर्गा कॉर्नर ते रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि देवधर सोसायटी परिसरातील रस्त्यांचा यात समावेश आहे.

यासाठी सुमारे 7 कोटी 90 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.   सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.