Chinchwad News : डिस्ट्रिक्ट लायन्स ऑक्सिजन बॅंकेचे महापौरांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज – दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ़ लायन्स क्लब्स 3234 D2 च्या लायन्स कोविड टास्क फोर्सच्या वतीने ‘डिस्ट्रिक्ट लायन्स ऑक्सिजन बॅंकेचे’ उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते नुकतेच चिंचवड येथे करण्यात आले. 

यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री, उपप्रांतपाल हेमंत नाईक, माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, लायन्स क्लब ऑफ़ अग्र सफायरचे अध्यक्ष भीमसेन आगरवाल, लायन्स कोविड फोर्सचे समन्वयक  मुख्य आयोजक परमानंद शर्मा आदी उपस्थित होते.

पालिकेच्या वैद्यकीय सेवेला लायन्स क्लबकडून सहकार्य मिळत असल्याने रुग्णाचे जीव वाचण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास महापौर उषा ढोरे यांनी यावेळी व्यक्त केला.

_MPC_DIR_MPU_II

परमानंद शर्मा म्हणाले, गरजू व गरीब रुग्णांसाठी या बॅंकेमध्ये 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन उपलब्ध आहेत. पाच दिवस विनामूल्य या मशिन दिल्या जातील. मशीन बुकिंगसाठी लायन्स कोविड टास्क फोर्सच्या वेबसाईटला भेट द्यावी.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश बागडी, हरी नायर, सुहास गनबोटे, मधुरा बुटाला, निलेश माटे, प्रदीप कुलकर्णी, मकरंद शाळिग्राम, प्रमोद नायर, राजेंद्र कोळी, के एम रॉय, सुनील चेकर, दामाजी आसबे, अमृत काळोखे, गुलशन पॉल, प्रीती बोंडे, अनूप ठाकूर, भरत इंगवले, प्रशांत कुलकर्णी, विजय आगरवाल, उमेश आगरवाल,राजेश अग्रवाल, प्रमोद नायर यांनी परिश्रम घेतले.

प्रास्ताविक भीमसेन अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन परमानंद शर्मा यांनी, तर  अनिल झोपे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.