Chinchwad News: …अन् फडणवीस भेटताच अंपगात्वर मात केलेल्या मिलिंदला अश्रू अनावर

एमपीसी न्यूज – दीड वर्षांपूर्वी इंदिरानगर, चिंचवड येथील अतिशय गरीब कुटुंबातील खुबा निकामी झालेल्या मिलिंद कांबळे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळाल्याने त्यांच्यावर वेळीच उपचार झाले. त्यामुळे त्यांनी अपंगावर मात केली.

भाजप सचिव अमित गोरखे यांच्या विनंतीला मान देत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तत्काळ मदत दिल्यामुळे मिलिंदने अपंगावर मात केली. मिलिंद याने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आभार मानले. फडणवीस दिसताच त्याला अश्रू अनावर झाले.

पदवीधर निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस बुधवारी (दि.25) शहरात आले होते. त्यावेळी भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या माध्यमातून फडणवीस यांची भेट घेत मिलिंद कांबळे यांनी मदतीबद्दल लिहिलेले पत्र आणि पेन फडणवीस यांना भेट दिले. तुमच्यामुळेच मी अपंगावर मात करु शकलो असे सांगतानाच मिलिंदला अश्रू अनावर झाले.

याबाबत मिलिंद सांगतात, बरोबर दीड वर्षांपूर्वी पायाचा खुबा निकामी झाला होता. पूर्ण आयुष्य आता अपंगत्व येते, असे वाटायला लागले. खासगी रुग्णालयात या ऑपरेशनसाठी भलीमोठी रक्कम लागणार होती. ती मला भरणे शक्यच नव्हते, आणि जर हे ऑपरेशन झाले नाही. तर, माझा उजवा पाय कापला जाणार हे नक्की होते. अशा परिस्थितीत मित्रमंडळींबरोबर मी अमित गोरखे यांना भेटलो आणि त्यांनी मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोठी रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

फक्त आश्वासनच नाही. तर, माझी कागदपत्रे घेऊन माझे काही मित्र अमित गोरखे यांच्यासोबत मुंबईत गेले. देवेंद्रजीना भेटले. त्यांनी ताबडतोब लगेच फोन करून संबधीत विभागाला कुठल्याही परिस्थितीत हे ऑपरेशन मोफत करून घेण्याचे आदेश दिले. पिंपरी-चिंचवड मध्ये एका नामांकित दवाखान्यात माझे ऑपरेशन झाले.

फडणवीस आणि गोरखे यांच्यामुळे माझ्या पायावर उभा राहू शकलो!
मी माझ्या पायावर उभा राहू शकलो ते फक्त अमित गोरखे व माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे, माझ्यासारखा झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुणाची व्यथा देवेंद्रजींनी ऐकली. हे मी माझे भाग्य समजतो. म्हणून मी या देव माणसाला प्रत्यक्ष भेटून एक पेन गिफ्ट केले. ते त्यांनी नम्रपणे स्वीकारले व माझी चौकशी केली. त्यांना पाहून मात्र माझे आनंदाश्रू अनावर झाले. देवेंद्रजी व अमित गोरखे यांचा मी कायम ऋणी राहीन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.