Chinchwad News : मनसे विधी कक्षातर्फे मास्क, सॅनिटायझर वाटप करुन ‘महामानवा’स अभिवादन

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभागाच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. या निमित्त नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून चिंचवड स्टेशन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभाग शहर उपाध्यक्ष मिलिंद सोनवणे, पिंपरी विधानसभा उप विभाग अध्यक्ष महेंद्र निशिगंध, गणेशभाऊ गरड युवा मंचचे गणेश गरड, मल्लेश पिल्लोलू, शंकर बनसोडे, अशोक निशिगंध उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.