Chinchwad News: चिंचवड एमआयडीसीतील मॉडर्न ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाचे 24 व्या वर्षात यशस्वी पदार्पण

एमपीसी न्यूज – तत्पर व विनम्र सेवा आणि 100% शुद्धता या तत्त्वांचे पालन करीत चिंचवड एमआयडीसीतील बर्ड व्हॅली उद्यानासमोरील मॉडर्न ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाने 23 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 24 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. त्यानिमित्त ग्राहकांसाठी एक्स्ट्रा रिवॉर्ड ही पेट्रोकार्ड स्कीम सुरू केली आहे. 

 मॉडर्न ऑटोमोबाईल पेट्रोल पंप हा संपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित म्हणजेच फुल्ली ऑटोमेशन केलेला आहे. हवा भरण्यासाठी ऑटोमॅटिक एअर मशीन बसवली असून स्वतंत्र टॉयलेट,सीसीटीव्ही कॅमेरा, कार्ड स्वॅपिंग, एक्स्ट्रा पॉवर फिलिंग कार्ड मशिन,सर्व प्रकारचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि सर्व ऑनलाईन सेवा तसेच पेटीएम सेवा व पेटीएम मुव्हीक्वीक येथे उपलब्ध आहेत. शिवाय नायट्रोजन आणि पीयूसी सेवाही येथे उपलब्ध आहेत. ग्राहकांना पैसे काढता येणे सोयीचे व्हावे म्हणून पंपावर एटीएम मशिनची सुविधाही आहे.

 या पंपावर एकूण 20 कर्मचारी कामाला असून तीन शिफ्टमध्ये काम चालते. कर्मचाऱ्यांना कंपनीचा संपूर्ण पोषाख दिला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंपावर सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. पंपावर फक्त मास्कधारकांनाच इंधन दिले जाते. पेट्रोल भरून झाल्यावर समोरच हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटाइझर स्टँड ठेवण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात सरकारने दिलेल्या वेळेनुसार सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत सेवा देण्यात येत होती. आता पंपावर पूर्णवेळ म्हणजे 24X7 सेवा पुरविली जाते.

24 व्या वर्षात पदार्पण करताना मॉडर्न ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाने ग्राहकांच्या सोयीसाठी खास एक्स्ट्रा रिवार्ड (Extra Reward) पेट्रोकार्ड ही स्कीम आणली आहे. या स्कीमअंतर्गत ग्राहकांना एक्स्ट्रा रिवार्ड पेट्रोकार्ड दिले जाते.यामुळे पेट्रोल भरल्यानंतर भेडसावणाऱ्या इतर समस्या संंपुष्टात येऊन ग्राहकांचा वेळही वाचतो, शिवाय या स्कीमअंतर्गत पेट्रोकार्डवर पॉईंट दिले जातात व एक ठराविक पॉईंटचा आकडा पूर्ण झाल्यावर 100 रुपयांचे पेट्रोल मोफत दिले जाते.

पेट्रोकार्डची सुविधा प्रत्येक इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. कंपनीच्या पंपावर उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहक या स्कीमचा लाभ घेत आहेत. हा पेट्रोल पंप निहाल पानसरे यांच्या मालकीचा असून युसूफ शेख हे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

मॉडर्न ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने निहाल पानसरे परिवाराच्या वतीने सर्व ग्राहकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त निहाल पानसरे परिवार आणि मॉडर्न ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाच्या टीमकडून पिंपरी-चिंचवडच्या सर्व नागरिकांना आणि ग्राहकांना हार्दिक  शुभेच्छा!

पत्ता

मॉडर्न ऑटोमोबाईल पेट्रोल पंप

प्लॉट नंबर पी  -11, डी- वन ब्लॉक , चिंचवड एमआयडीसी,

टाटा मोटर्स रोड, बर्ड व्हॅली गार्डन समोर, पुणे – 411 019  

संपर्क – युसूफ शेख 9822088473 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.