Chinchwad News : अनाथ अर्भकांची जबाबदारी पालिकेने घ्यावी, विमेन्स हेल्पलाईन फाऊंडेशनची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात जिवंत व मृत अर्भके सापडण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. त्या घटनांना आळा घालत संबंधित अर्भकांच्या पालकांचा शोध घेणे आवश्यक आहे. दरम्यान अशा अनाथ अर्भकांची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, अशी मागणी विमेन्स हेल्पलाईन फाउंडेशनने केली आहे. 

विमेन्स हेल्पलाईन फाउंडेशनच्या वतीने पालिका आयुक्त आणि वाकड पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात स्त्री जातीचे अर्भक जन्माला घालून त्याला जिवंत अथवा मृत अवस्थेत फेकून देण्याचे तसेच निर्जन स्थळी सोडून देण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा अर्भकांना त्याचे पालक मिळेपर्यंत पालिकेने सांभाळावे. त्या अर्भकांची जबाबदारी पालिकेने घ्यावी.

 

_MPC_DIR_MPU_II

वाकड पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनैतिक संबंधांमधून मुले जन्माला घालणे आणि त्या अर्भकाचा परित्याग करण्याची विकृती वाढत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सर्व रुग्णालयांना निर्बंध घालणे आवश्यक आहे. वाकड परिसरात सापडलेल्या अर्भकाच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना विमेन्स हेल्पलाईन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता परदेशी, पिंपरी चिंचवड अध्यक्षा अ‍ॅड. सारिका परदेशी, तसेच दीपाली येवले, स्मिता राहुडे आदी सदस्या उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.