Chinchwad news: नाना काटे यांनी जिंकली कोरोनाविरोधातील लढाई !

सकारात्मकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या शुभेच्छांच्या जोरावर आज कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाल्याचे काटे यांनी म्हटले आहे.

एमपीसी न्यूज – प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी चिंचवड पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आज (मंगळवारी) कोरोनावर यशस्वी मात केली. 

याबाबत अधिक माहिती देताना नाना काटे म्हणाले, महापालिकेच्या तेरा महिन्यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या कार्यकाळातील साडे पाच महिने कोरोना महामारीविरुद्ध शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करण्याचा योग आला.

यादरम्यान सर्व प्रोटोकॉल पाळले. मात्र, कर्तव्य बजावताना मलाही कोरोनाची लागण झाली. 27 ऑगस्ट रोजी चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

शासनाच्या दिशानिर्देशानुसार नियमांचे पालन करत आयसोलेशन पिरियड सुरू झाला. चाचणीचा निकाल आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरू झाले.

मात्र, कुठल्याही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. कारण कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचणीवर मात करायची असेल तर विचारांची सकारात्मकता आवश्यक आहे.

ही सकारात्मकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या शुभेच्छांच्या जोरावर आज कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाल्याचे काटे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.