Chinchwad News : नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारला

कृष्ण प्रकाश यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मुंबई येथे कार्यरत होते.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज, शनिवारी पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या जागी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना के पी आयर्नमॅन म्हणून ओळखले जाते. ते झारखंड मधील हजारीबाग येथील असून 1998च्या बॅचचे आयपीएस कॅडेट आहेत.

सायकलिंग, स्विमिंग, रनिंग यासाठी प्रसिद्ध असलेल्या कृष्ण प्रकाश यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 45 अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशावर बुधवारी (दि.2) स्वाक्षरी केली त्यानुसार पोलीस दलात खांदेपालट करण्यात आली.

कृष्ण प्रकाश यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मुंबई येथे कार्यरत होते.

सतत हसतमुख आणि आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेले कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत.

शहरातील गुन्हेगारी रोखण्यात तसेच शहरात पोलिसांचा वचक निर्माण करण्यास ते यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.