Chinchwad news: वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र दळवी यांचे निधन

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन येथील वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र रंगनाथ दळवी (वय 78) यांचे शुक्रवारी (दि.2) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

दळवी कुटूंबीय मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहे. अनेक वर्षांपासून ते चिंचवड स्टेशन येथे स्थायिक झाले आहेत. रामचंद्र दळवी यांनी सुरुवातीला गरवारे कंपनीत नोकरी केली. निवृत्तीनंतर वृत्तपत्र विक्रीचे ते काम करत होते. यापूर्वी त्यांना पॅरेलेसीसचा ॲटक आला होता. मागील तीन वर्षांपासून ते घरीच होते.

तीन दिवसांपासून त्यांनी जेवण कमी केले होते. शुक्रवारी दुपारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तत्काळ संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी घशातील द्रावाचे नमुने घेतले. नमुने घेतल्यानंतर लगेच रामचंद्र दळवी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर चिंचवड, लिंक रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘एमपीसी न्यूज’, ‘अंतरंग’चे कर्मचारी अनिल दळवी यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.