Chinchwad News : अणू उर्जा हा अधिक कार्यक्षम, सुरक्षित ऊर्जा स्रोत – अमृतेश श्रीवास्तव

एमपीसी न्यूज – न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यावतीने सायन्स पार्क येथे “अणू उर्जा एक शाश्वत व कार्यक्षम ऊर्जा स्त्रोत ” या विषयावर उप-महाप्रबंधक अमृतेश श्रीवास्तव यांचे रविवारी व्याख्यान झाले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात (Chinchwad News) दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.
मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी दुभाषी विशेष शिक्षका द्वारे संवाद साधण्यात आला. अणू उर्जा हा अधिक कार्यक्षम व सुरक्षित ऊर्जा स्रोत असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
Chinchwad Bye Election : पोटनिवडणुकीची अधिसूचना उद्या, थेरगावात उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार
न्यूक्लियर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर्फे अणू उर्जा संदर्भात माहितीचे छोटे दालन सायन्स पार्क येथे उभारण्यात येणार असल्याचे अमृतेश श्रीवास्तव यांनी जाहीर केले. या प्रसंगी सायन्स पार्कचे संचालक प्रविण तुपे यांनी प्रमुख वक्त्यांचे (Chinchwad News) स्वागत केले.