Chinchwad News: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रक्तदान शिबिरातून दिला महिलांना सन्मान

एमपीसी न्यूज – रक्त आटऊन जी कुटुंबासाठी झिझते, अपार कष्ट आणि मेहनत घेते. त्या आईसाठी, ताईसाठी महीला दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरिजा कुदळे, राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके आणि मैत्री व्यासपीठाच्या अपर्णा मिसाळ यांच्या हस्ते झाले.

_MPC_DIR_MPU_II

सुलभा उबाळे म्हणाल्या की महिलेच दिवस 365 दिवसातून एकच दिवस नसावा. महिला ही घरासोबत देशाचा गाडा चालऊ शकते. गिरिजा कुदळे म्हणाल्या की आज व्यासपीठावर सगळ्याच महिला आहेत, हा खरा महिलांचा सन्मान आहे.

रक्तदान शिबिर हा त्या महिलेला दिलेल्या सन्मानाचा एक भाग आहे, असे पदवीधरचे अध्यक्ष माधव पाटील म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी महिला बचत गटाच्या अध्यक्षा कविता खराडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, संगीता कोकणे, मनीषा गटकळ, शिल्पा बिडकर, स्वप्नाली असोले, पल्लवी पांढरे, आशा धनवे, शबनम पठाण, शारदा मुंडे, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, राष्ट्रवादी कामगार सेलचे किरण देशमुख, उपाध्यक्ष अकबर मुल्ला शक्रुल्ला पठाण, निलेश पुजारी, अभिजित आल्हाट, हमीद शेख , प्रदेश युवक सरचिटणीस लाला चिंचवडे, सामाजिक न्यायचे अध्यक्ष विनोद कांबळे तसेच पदवीधरचे कार्याध्यक्ष युनूस शेख आणि पदाधिकारी सुप्रीत जाधव , वंदना पेडनेकर ,गणेश उबाळे,अभिजित घोलप, धीरज आंब्रे, किशोर निकम, दिपाली निर्मल,रोहिणी वारे, ओमकार नायडू आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.