Chinchwad news: दिवाळीनिमित्त चापेकरवाडा 151 दिव्यांनी उजळला 

एमपीसी न्यूज – दिवाळीनिमित्त चिंचवडगावातील चापेकर वाड्यात दिवे लावण्यात आले.  151 दिव्यांच्या प्रकाशाने चापेकरवाडा उजळून निघाला. चापेकर वाड्याचे नेत्रदीपक रूप पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

चिंचवडगावात शुक्रवारी (दि.13) झालेल्या कार्यक्रमाला क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सह कार्यवाह रवी नामदे, सदस्य गतीराम भोईर, निता मोहिते, नितीन बारणे, अशोक पारखी, सुनीता घोडे आदी उपस्थित होते.

आज धनत्रयोदशी आहे. खऱ्या अर्थाने आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळीनिमित्त चापेकर वाडा दिव्यांनी उजळून निघाला. यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे उपस्थित मास्कचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.