Chinchwad News: पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त केंद्र सरकार, महापालिकेच्या विविध योजनांची माहिती

एमपीसी न्यूज – भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरु असलेल्या ‘सेवा व समर्पण’ सप्ताह अभियाना अंतर्गत नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने चिंचवडगावातील सर्व सोसायट्यांमध्ये ‘मतदार नोंदणी अभियान, केंद्र सरकार व महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती व अर्ज वाटप त्याचबरोबर मोफत आधार व मतदार स्मार्टकार्ड’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात भारतीय जनता पक्षाचे विभाग संघटनमंत्री रवि अनासपुरे, पिंपरी-चिंचवड शहराचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, शांतीबन सोसायटीचे अध्यक्ष शिवलिंग कोडूळे व गोखले वृंदावन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप तसेच सचिव सदनंद केळकर, काकडे पार्क सोसायटीचे सचिव राजन पाटील यांच्या हस्ते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून चिंचवडगावातील सर्वात मोठी गृह संकुले असलेल्या शांतीबन व गोखले वृंदावन या सोसायट्यांमधून करण्यात आली.

यावेळी ब’ प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, वृक्ष प्राधिकरण सदस्य गोविंद पानसरे, भाजपा चिंचवड किवळे मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे, भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, भाजयुमोचे प्रदेश सदस्य अजित कुलथे, भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश सदस्य प्रदिप सायकर, भाजप सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष धनंजय शाळिग्राम, भाजप सोशल मिडियाचे अध्यक्ष अमेय देशपांडे, भाजप चिंचवड किवळे मंडलाचे सरचिटणीस रविंद्र प्रभुणे, चिंचवडगाव प्रभाग अध्यक्ष मिथुन बोरगांव, राघूशेठ चिंचवडे, वसंतशेठ गुजर, विक्रांत नवले, केदार बावळे, अजय खोल्लम आदी प्रमुख भाजप कार्यकर्ते व शांतीबन व गोखले वृंदावन गृह संकुलातील नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.