Chinchwad News: महापालिकेत लक्ष घालणे म्हणजे राजकारण नाही – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – लघुउद्योग संघटनेचे अनेक प्रश्न पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित आहेत. मी महापालिकेत लक्ष घालतोय. परंतु, महापालिकेत लक्ष घालणे म्हणजे केवळ राजकारण नसावे. लोकांचे जीवनमान, राहणीमान सुरळीत होणे महत्वाचे आहे. त्यांच्या प्रश्नांवर अधिक प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला असून या अर्थसंकल्पावर संसदेत चर्चा होणार आहे. या अर्थसंकल्पात लघुउद्योजकांना अपेक्षित अशा तरतूदी नाहीत. या विषयांवर पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पदाधिका-यांशी डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (शनिवारी) संवाद साधला.

_MPC_DIR_MPU_II

पत्रकारांशी बोलताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, अर्थसंकल्पाबाबत लघुउद्योजकांचे मत जाणून घेतले. त्यांना मदत होईल अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला जाईल. जीएसटीचा निर्णय धोडासा घाईने घेतला गेला. विचार करुन घेतला नाही. 27 ते 28 पेक्षा जास्त वेळा जीएसटीमध्ये बदल केला आहे. सुधारीत जीएसटी, व्हॅट कमी करण्याची अनेकांची मागणी आहे. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे.

महापालिकेचे कर्तव्य, त्यांच्याकडूनची अपेक्षापूर्तीकरणे महत्वाचे आहे. त्यामुळे लोकांचे जीवनमान, राहणीमान सुरळित होणे महत्वाचे आहे. त्याच्यावर अधिक प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.