Chinchwad News: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 114 जणांच्या विरोधात खटला दाखल

टाळेबंदीचे पालन करण्याबाबत पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. 27) एका दिवसात 114 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.

टाळेबंदीचे पालन करण्याबाबत पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. कोरोना साथीचा उद्रेक होत आहे. शहरात दररोज हजारो नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. ही चिंतेची बाब आहे.

नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रशासनाकडून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे.

पोलीस प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर थेट गुन्हे दाखल नोंदवून त्यांच्यावर खटले दाखल करत आहेत. गुरुवारी (दि. 27) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दाखल केलेले खटले खालीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (16), भोसरी (1), पिंपरी (10), चिंचवड (7), निगडी (9), आळंदी (8), चाकण (2), दिघी (5), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (19), वाकड (11), हिंजवडी (0), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (23), चिखली (0), रावेत चौकी (3), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.