Chinchwad News: टाळेबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 59 जणांवर खटले दाखल

टाळेबंदीतून काही प्रमाणात सूट देखील देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने काही नियम अजूनही लागू आहेतच.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे पालन न केल्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यात 59 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात दररोज हजारोंच्या संखेने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने टाळेबंदी जाहीर केली आहे.

दरम्यान, टाळेबंदीतून काही प्रमाणात सूट देखील देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने काही नियम अजूनही लागू आहेतच. या नियमांचे पालन न करणा-या व्यक्तींच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

मंगळवारी (दि.1) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाळेबंदीचे उल्लंघन केल्याबाबत दाखल केलेल्या खटल्यांची आकडेवारी –

एमआयडीसी भोसरी (19), भोसरी (2), पिंपरी (8), चिंचवड (0), निगडी (0), आळंदी (0), चाकण (0), दिघी (5), म्हाळुंगे (0), सांगवी (1), वाकड (0), हिंजवडी (5), देहूरोड (1), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (18), रावेत (0), शिरगाव (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.