Chinchwad News: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मंगळवारी 81 जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (दि. 29) 81 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत, अशांवर कारवाई केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे दंड न भरल्यास गुन्हे दाखल केले जात आहेत.

तसेच अन्य आदेशांचे उल्लंघन करणा-यांवर पोलीस कारवाई करीत आहेत. मंगळवारी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (17), भोसरी (9), पिंपरी (3), चिंचवड (4), निगडी (1), आळंदी (6), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (10), वाकड (12), हिंजवडी (11), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (7), रावेत चौकी (1), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.