Chinchwad News: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सोमवारी 100 जणांवर कारवाई

Chinchwad News: Pimpri-Chinchwad police take action against 100 people on Monday for violating lockdown rules ळेबंदीचे नियम नागरिकांनी पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, काही नागरिक या नियमांना पायदळी तुडवत आहेत.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि.17) 100 जणांवर कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दररोज 800 ते 1000 रुग्णांची भर पडत आहे. यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. टाळेबंदीचे नियम नागरिकांनी पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, काही नागरिक या नियमांना पायदळी तुडवत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील 23 जणांचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहराच्या विविध भागातील 681 आणि पालिका हद्दीबाहेरील 23 अशा 704 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 36 हजार 78 झाली आहे.

सोमवारी (दि. 17) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (28), भोसरी (8), पिंपरी (10), चिंचवड (7), निगडी (3), आळंदी (0), चाकण (0), दिघी (3), म्हाळुंगे चौकी (2), सांगवी (3), वाकड (7), हिंजवडी (5), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (5), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (21), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.