Chinchwad News: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुरुवारी 133 जणांवर कारवाई

Chinchwad News: Pimpri-Chinchwad police take action against 133 people on Thursday who violating lockdown rules शहराच्या विविध भागातील 1 हजार 105 आणि पालिका हद्दीबाहेरील 26 अशा 1 हजार 131 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि.20) 133 जणांवर कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत गुरुवारी पुन्हा मोठ्या संखेने वाढ झाली आहे. शहराच्या विविध भागातील 1 हजार 105 आणि पालिका हद्दीबाहेरील 26 अशा 1 हजार 131 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 38 हजार 821 झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 371 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी शहरातील 17 आणि पालिका हद्दीबाहेरील 4 अशा 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

गुरुवारी (दि. 20) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (21), भोसरी (15), पिंपरी (12), चिंचवड (5), निगडी (9), आळंदी (10), चाकण (0), दिघी (5), म्हाळुंगे चौकी (1), सांगवी (0), वाकड (10), हिंजवडी (20), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (5), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (19), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (1)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.