Chinchwad News: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 75 जणांवर कारवाई

शासनाने अनलॉक चारची नियमावली शनिवारी (दि.29) जाहीर केली आहे. त्यामध्ये टाळेबंदीतून ब-याच प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि.30) शहरातील 75 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.

शासनाने अनलॉक चारची नियमावली शनिवारी (दि.29) जाहीर केली आहे. त्यामध्ये टाळेबंदीतून ब-याच प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. विशिष्ट भाग वगळता अन्य कोणत्याही भागात टाळेबंदी लागू करताना राज्य सरकारला आता केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रवासासाठी दिले जाणारे इ-पास बंद करण्याबाबत देखील केंद्राच्या नियमावलीत सांगण्यात आले आहे.

यामुळे टाळेबंदीतून नागरिकांची सुटका होत आहे. मात्र, कोरोनातून अजूनही सुटका झालेली नाही. कोरोनाचा विळखा अजूनही वाढतच आहे. शहरात दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना बाधितांचे आकडे वाढत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी एक हजार 77 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पालिकेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

प्रशासनाकडून रुग्णालयांच्या निर्मितीबरोबरच काळजी घेण्याचे, सुरक्षित राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. रविवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (12), भोसरी (8), पिंपरी (13), चिंचवड (4), निगडी (3), आळंदी (3), चाकण (0), दिघी (6), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (4), वाकड (6), हिंजवडी (4), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (12), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.