Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवशी सात वाहनचोरीच्या गुन्ह्यांची नोंद

"वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या मुळाशी जाऊन तपास करणे गरजेचे आहे. त्यासाठी वाहन चोरी प्रतिबंधक पथक सुरु करण्याचा विचार - पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी भोसरी, निगडी, चाकण, सांगवी, वाकड या पोलीस ठाण्यांमध्ये गुरुवारी (दि. 10) सात वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहन चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. यामध्ये दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

पहिला गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यामध्ये श्रद्धा रवींद्र कुदळे (वय 46, रा. एचडीएफसी कॉलनी, चिंचवड) यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुदळे यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / ए पी 7179) 7 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता तुळशी लॅंडमार्क सोसायटी जवळ स्पाईनरोडच्या पुलावर पार्क केली होती. तिथून अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

दुसरा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अतुल शामराव कुलकर्णी (वय 32, रा. सिंधूनगर, प्राधिकरण निगडी) यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुलकर्णी यांनी त्यांची होंडा युनिकॉर्न दुचाकी (एम एच 14 / डी डब्ल्यू 4167) 25 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुस-या दिवशी सकाळी उघडकीस आला.

तिसरा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विजयकांत हरिप्रसाद पांडे (वय 38, रा.  यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पांडे यांनी त्यांची 25 हजारांची ड्रीम युगा दुचाकी (यु पी 35 / ए जे 1222) खालुंब्रे येथे घरासमोर पार्क केली होती. तिथून चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 7 सप्टेंबर रात्री दहा ते 8 सप्टेंबर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला.

चौथा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मणीकदन शंकर स्वामी (वय 30, रा. नवी सांगवी) यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी स्वामी यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची टीव्हीएस दुचाकी (एम एच 14 / डी एल 0603) 5 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.

पाचवा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पीटर सुरेश साळवे (वय 37, रा. वेणुनगर, वाकड) यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी साळवे यांनी त्यांची सात हजार रुपये किमतीची हिरो होंडा दुचाकी (एम एच 14 / सी 4166) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क करून ठेवेली होती. पार्किंगमधून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 2 सप्टेंबर दुपारी पाच ते 3 सप्टेंबर पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडला.

सहावा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गणेश बबन घाडगे (वय 28, रा. सुखदा कॉलनी, वाकड) यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी घाडगे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (एम एच 50 / ई 1274) 29 ऑगस्ट रोजी रात्री एक वाजता घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. दुस-या दिवशी सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला.

सातवा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राहुल भीमराव साळुंके (वय 26, रा. खालुंब्रे, ता. खेड) यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी साळुंके यांनी त्यांची 22 हजार रुपयांची हिरो होंडा एच एफ डिलक्स दुचाकी (एम एच 17 / ए डब्ल्यू 4340) 9 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता खालुंब्रे येथील बडवे इंजिनिअरिंग कंपनीच्या गेट समोर पार्क केली. दिवसभरात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रात्री सात वाजता उघडकीस आला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या मुळाशी जाऊन तपास करणे गरजेचे आहे. त्यासाठी वाहन चोरी प्रतिबंधक पथक सुरु करण्याचा विचार आहे.”

वाहन चोरी प्रतिबंधक पथकाचे तत्कालीन पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे म्हणाले, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चोरी विरोधी पथक बरखास्त करण्यात आले. पथकातील कर्मचारी-अधिका-यांना गुन्हे शाखेच्या कारवाया, पेट्रोलिंग आणि पोलीस ठाण्यातील वयस्कर, आजारी पोलिसांच्या जागी काम देण्यात आले. हे काम अजूनही सुरु आहे. त्यामुळे अद्याप हे पथक स्वतंत्रपणे काम करत नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाचे काम सुरु होईल. पण त्यावेळी पथकात कोणते अधिकारी कर्मचारी असतील हे देखील वरिष्ठ अधिकारी ठरवतील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.