Chinchwad News : ‘अनलॉक पाच’च्या सुरुवातीलाच पोलिसांच्या कारवाईला ब्रेक

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून शिथिलता देत अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अनलॉकचा पाचवा टप्पा गुरुवार (दि. 1) पासून सुरु झाला आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केवळ 43 जणांवर कारवाई केली आहे.

अनलॉक पाचच्या सुरुवातीलाचा पोलिसांच्या कारवाईला ब्रेक लागला आहे. दिवसेंदिवस पोलिसांकडून केल्या जाणा-या कारवाईची संख्या घटत आहे. त्यामुळे नागरिक नियम पाळत आहेत की पोलीस कारवाई करीत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने अनेक उपाय सुचवले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे.

 पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी केलेली कारवाई 

एमआयडीसी भोसरी (4), भोसरी (3), पिंपरी (7), चिंचवड (1), निगडी (0), आळंदी (13), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (5), वाकड (4), हिंजवडी (6), देहूरोड (3), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (0), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.