Chinchwad News : पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षेचा वर्गवारीनुसार निकाल जाहीर 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 19 नोव्हेंबर रोजी झाली. या परीक्षेचासामाजिक व समांतर आरक्षण निहाय निकाल जाहीर झाला आहे. खुल्या गटाची सर्वसाधारण वर्गासाठी 85 गुणांची कट ऑफ लागली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या 720 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून लेखी परीक्षा घेण्यात आली. 720 जागांसाठी राज्यभरातून तब्बल एक लाख 89 हजार 732 अर्ज आले होते. या उमेदवारांची 19 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा झाली. पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या जिल्ह्यातील 444 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. 82 हजार 608 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.

पोलीस भरती निवड समितीने उमेदवारांनी आवेदन अर्जात भरलेल्या माहितीनुसार सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणानुसार कट ऑफ यादी जाहीर केली आहे. एकास दहा या प्रमाणात ही कट ऑफ यादी जाहीर करण्यात आली आहे. 11 हजार 534 उमेदवारांची यामध्ये निवड करण्यात आली आहे. हे उमेदवार कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करिता पात्र ठरले आहेत. कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी स्वतंत्ररित्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या संकेतस्थळावर सूचना देण्यात येणार आहे.

सामाजिक व समांतर आरक्षण निहाय निकाल –

खुला गट
सर्वसाधारण (85), महिला (79), खेळाडू (82), प्रकल्पग्रस्त (85), भूकंपग्रस्त (81), माजी सैनिक (69), अंशकालीन पदवीधर (35), पोलीस पाल्य (78), गृहरक्षक दल (78)

ई डब्ल्यू एस (आर्थिकदृट्या मागास)
सर्वसाधारण (81), महिला (63), खेळाडू (74), प्रकल्पग्रस्त (81), भूकंपग्रस्त (78), माजी सैनिक (36), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (63), गृहरक्षक दल (62)

इतर मागास प्रवर्ग
सर्वसाधारण (79), महिला (67), खेळाडू (70), प्रकल्पग्रस्त (77), भूकंपग्रस्त (62), माजी सैनिक (42), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (65), गृहरक्षक दल (59)

विशेष मागास प्रवर्ग
सर्वसाधारण (77), महिला (64), खेळाडू (46), प्रकल्पग्रस्त (65), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (38), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (-), गृहरक्षक दल (41)

भटक्या जमाती – ड
सर्वसाधारण (81), महिला (67), खेळाडू (64), प्रकल्पग्रस्त (82), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (53), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (-), गृहरक्षक दल (60)

भटक्या जमाती – क
सर्वसाधारण (81), महिला (69), खेळाडू (61), प्रकल्पग्रस्त (81), भूकंपग्रस्त (65), माजी सैनिक (51), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (62), गृहरक्षक दल (64)

भटक्या जमाती – ब
सर्वसाधारण (81), महिला (72), खेळाडू (69), प्रकल्पग्रस्त (74), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (33), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (69), गृहरक्षक दल (69)

विमुक्त जाती – अ
सर्वसाधारण (81), महिला (69), खेळाडू (68), प्रकल्पग्रस्त (79), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (37), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (67), गृहरक्षक दल (67)

अनुसूचित जमाती
सर्वसाधारण (71), महिला (55), खेळाडू (41), प्रकल्पग्रस्त (62), भूकंपग्रस्त (42), माजी सैनिक (48), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (42), गृहरक्षक दल (41)

अनुसूचित जाती
सर्वसाधारण (77), महिला (67), खेळाडू (60), प्रकल्पग्रस्त (73), भूकंपग्रस्त (68), माजी सैनिक (33), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (66), गृहरक्षक दल (59)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.