Chinchwad News: टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 124 जणांवर बुधवारी पोलिसांकडून कारवाई

शासनाने राज्य परिवहन महामंडळाची बससेवा राज्यभर सुरु केली आहे. शासनाच्या बसने प्रवास करण्यासाठी कुठल्याही पासची गरज लागणार नाही.

एमपीसी न्यूज – पोलीस आणि प्रशासनाकडून नागरिकांना टाळेबंदीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, याकडे नागरिक सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी (दि.26) 124 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्य सरकारने वाहनांमध्ये जाणा-या लोकांच्या संख्येत वाढ केली आहे. कारमधून चालक आणि दोन प्रवाशांना आतापर्यंत परवानगी होती. मात्र त्यात बदल करत आता चालक आणि तीन जणांना कारमधून जाण्यास तसेच दुचाकीवर दोघांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शासनाने राज्य परिवहन महामंडळाची बससेवा राज्यभर सुरु केली आहे. शासनाच्या बसने प्रवास करण्यासाठी कुठल्याही पासची गरज लागणार नाही.

शासनाकडून टप्प्याटप्प्यात टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. अनेक दुकाने आणि आस्थापना अजूनही बंद आहेत. त्यातच शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा अजूनही बंद असल्याने नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे.

त्यात टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलीस कारवाई करीत आहेत. त्यामुळे प्रशासनासह नागरिक देखील तारेवरची कसरत करीत आहेत.

गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (14), भोसरी (8), पिंपरी (7), चिंचवड (9), निगडी (13), आळंदी (4), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (2), वाकड (14), हिंजवडी (19), देहूरोड (1), तळेगाव दाभाडे (1), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (25), रावेत चौकी (1), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.