Chinchwad News: टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 149 जणांवर बुधवारी पोलिसांकडून कारवाई

Chinchwad News: Police take action against 149 people for violating lockdown order on Wednesday प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि.12) 149 जणांवर कारवाई केली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. दररोज 800 ते 1000 रुग्णांची भर पडत आहे. यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. टाळेबंदीचे नियम नागरिकांनी पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, काही नागरिक या नियमांना पायदळी तुडवत आहेत.

शनिवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (27), भोसरी (12), पिंपरी (9), चिंचवड (14), निगडी (4), आळंदी (0), चाकण (3), दिघी (14), म्हाळुंगे चौकी (3), सांगवी (0), वाकड (25), हिंजवडी (3), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (32), चिखली (1), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (2)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.