Chinchwad News : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा सीबीएसई 12 वीचा निकाल 100 टक्के

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा सीबीएसई बोर्ड इयत्ता 12 वीचा निकाल 100 टक्के लागला आहे.

हेमांगी कश्यप हिने प्रथम क्रमांक पटकावित 95 टक्के गुण मिळविले. दुसरा क्रमांक खुशी मांडोत व ईशल शेख हिने 94.14 टक्के गुण प्राप्त केले. तर, तिसरा क्रमांक केवीन कार्तिक ह्याने 93.17 टक्के गुण प्राप्त केले.

कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस, समन्वयिका खुश्नुमा सय्यद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.