Chinchwad News: संभाजीनगर, शिवतेजनगर परिसरात रघुवीर समर्थ प्रभात फेरी सुरु

एमपीसी न्यूज – संभाजीनगर, शाहूनगर, पूर्णानगर, शिवतेजनगर परिसरात श्री रघुवीर समर्थ प्रभात फेरी पुन्हा सुरु झाली. आज (शनिवारी) ही फेरी काढण्यात आली.

प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येत होते. परंतु, लॉकडाऊनमुळे श्री रघुवीर समर्थ मनाचे श्लोक या प्रभात फेरीला ब्रेक लागला होता. परंतु, शासनाने परवानगी दिल्यानंतर पुन्हा प्रभात फेरी सुरु करण्यात आली आहे.

त्यानुसार आज प्रभात फेरी श्री गणपती मंदिर संभाजीनगर, काका हलवाई, महाबली मंदिर, शनी मंदिर, शिवसाई चौक पूर्णानगर, श्री स्वामी समर्थ चौक, तिरंगा चौक, संभाजीनगर या मार्गे प्रभात फेरी काढण्यात आली.

परिसरातील नागरिकांनी प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला या प्रभात फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.