Chinchwad News : ‘राम गणेश गडकरी करंडक’ राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा गुरूवारपासून

एमपीसी न्यूज – राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा गुरूवारपासून (दि.11) सुरू होत आहे. स्पर्धेचे हे 25 वे म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, कोहिनूर ग्रुप पुरस्कृत चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठानच्या वतीने हि एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे. यंदा स्पर्धेत एकूण 35 संघ सहभागी होत असून त्यापैकी 21 संघ बाहेरगावचे आहेत.

यात चंद्रपूर, अमरावती, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, मुंबई, सोलापूर, इचलकरंजी आदी विविध भागातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.

एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने नाट्य़ रसिकांना एकूण 35 एकांकिका पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेसाठी प्रतिदिन 50 रुपये प्रवेशमूल्य ठेवण्यात आले आहे. यामध्ये दररोज 9 ते 10 एकांकिका पाहता येतील.

स्पर्धेची लोकप्रियता पाहता पुढील वर्षांपासून प्राथमिक स्पर्धा राज्यभरात घेतली जाणार आहे. तर अंतिम स्पर्धा चिंचवड येथे होईल असे भोईर यांनी सांगितले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण संमारंभ रविवारी (दि.14) सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे. स्पर्धेचे संयोजन सुहास जोशी, किरण येवलेकर, नरेंद्र आमले, राजेंद्र बंग, जयराज काळे, नितीन शिंदे, संतोष शिंदे, महेश लाकाळ तसेच गौरी लोंढे करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.