Chinchwad news: लहुजी साळवे व क्रांतीवीर फडके यांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी 37 लाख रुपये मंजूर

नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन येथील लहुजी वस्ताद साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा महाराष्ट्रातील सर्वात जुना अर्धपुतळा चिंचवड स्टेशन येथे 16 मे 1985 रोजी स्थापित करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृती सदैव मनात राहाव्या,या उद्देशाने हे स्मृतिस्थळ महापालिकेने उभे केले आहे.

या दोन्ही पुतळ्यांवर मेघडंबरी तसेच सुशोभीकरण व्हावे म्हणून गेल्या वर्षापासून स्थानिक नगरसेविका अनुराधा गोरखे पाठपुरावा करत होत्या. त्याला यश आले असून या दोन्ही महान क्रांतिवीरांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी पालिकेने 37 लाख रुपये मंजूर केले आहेत.

या कामाची निविदाही मंजूर झाली आहे, लवकरच काम चालू होईल, अशी माहिती भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी दिली.

नगरसेविका अनुराधा गोरखे या ‘अ’ प्रभाग अध्यक्ष असताना या कामाचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. याचे सुशोभिकरण व्हावे म्हणून पाठपुरावा करून त्यांनी निधी मंजूर करून आणला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.