Chinchwad News: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते करताहेत अंत्यसंस्कार

Chinchwad News: RSS, Vishwa Hindu Parishad, Bajrang Dal activists are conducting funerals on those who died due to corona मागील सहा दिवसांत 18 हून अधिक अंत्यसंस्कार या स्वयंसेवकांनी केलेले आहेत

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाजवळ कुणालाही जाता येत नाही. तो मृतदेह नातेवाईकांच्या देखील ताब्यात दिला जात नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या हिंदू नागरिकांचे हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे.

_MPC_DIR_MPU_II

सध्याच्या अतिशय बिकट परिस्थितीत शहरातील भोसरी, निगडी, चिंचवड या ठिकाणी असणाऱ्या विद्युत दाहिनीमध्ये कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दमछाक होत होती.

तसेच मृतदेहाची विटंबना देखील काही अंशी होत होती, यावर उपाय म्हणून तरुण स्वयंसेवकांनी पुढे येऊन अंत्यसंस्कार विधीमध्ये आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सहकार्य करण्याचे ठरवले.

मागील सहा दिवसांत 18 हून अधिक अंत्यसंस्कार या स्वयंसेवकांनी केलेले आहेत, अशी माहिती कोरोना निवारण अभियान पिंपरी-चिंचवडचे अभियान प्रमुख बाळासाहेब लोहकरे यांनी दिली. या अंत्यविधी करणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये कुणाल साठे, अमर गावडे, चंद्रशेखर अहिरराव, संजय शेळके हे कार्यकर्ते कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.