Chinchwad News : सौभाग्याचे लेणं परत मिळालं, महिलादिनी पोलिसांची महिलांना भेट

एमपीसी न्यूज – चोरी, घरफोडी, दरोडा टाकून व चोरटयांनी हिसकावून घेतलेले दागिने आज महिला दिनाच्या (दि. 08) निमित्ताने महिलांना परत करण्यात आले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सन्मानाने सौभाग्याचे लेणं महिलांना परत करण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या उपस्थितीत हे दागिने वाटप करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, मंचक इप्पर, आनंद भोईटे व इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी व महिला उपस्थित होत्या. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते यावेळी महिलांना त्यांचे विविध मार्गांनी चोरी झालेले दागिने परत करण्यात आले. आपल्या सौभाग्याचे लेणे परत मिळाल्याने महिला आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यावेळी म्हणाले, महिलांनी आत्मनिर्भर व्हायला हवे, आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यातून मिळालेले सामर्थ्य तुम्हाला मजबूत करते. सर्वच स्तरातील महिलांचा सन्मान करणे आपलं कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केलं. पोलिसांबाबत लोकांच्या मनात नकारात्मक भावना आहे. पण, 90 टक्के पोलीस कर्मचारी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत असतात असे त्यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.