Chinchwad News : दुसरा पिंपरी-चिंचवड आंतराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव यावर्षी ऑनलाईन

दि. 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर 2020 पर्यंत पिंपरी-चिंचवड आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या ऑफिसिअल युट्यूब चॅनेल वरून प्रसारित होणार आहे.यामध्ये प्रेक्षकांना उत्कृष्ट लघु चित्रपट पहावयास मिळणार आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने भरवण्यात येणारा या वर्षीचा दुसरा पिंपरी-चिंचवड आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सव 2020 कोरोना महामारीमुळे व शासनाच्या नियमावलीनुसार ऑनलाईन स्वरूपात भरवण्यात येणार असून आज दि. 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर 2020 पर्यंत पिंपरी-चिंचवड आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या ऑफिसिअल युट्यूब चॅनेल वरून प्रसारित होणार आहे.यामध्ये प्रेक्षकांना उत्कृष्ट लघु चित्रपट पहावयास मिळणार आहेत.

फेस्टिव्हलचे डायरेक्टर रमेश होलबोले यांनी ही माहिती दिली.

https://www.youtube.com/channel/UCLbAaCXU4YDYnIlY8W36sgg?view_as=subscriber

यावर्षी जगभरातील 30 देशामधील आणि भारताच्या विविध राज्यातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय 340 लघु चित्रपट महोत्सवासाठी सहभागी झाले होते.

यामध्ये प्रामुख्याने यूएस, स्पेन, इराण, बेल्जियम, मलेशिया, इजिप्त, स्विर्झर्लंड, व्हीयएतनाम, साऊथकोरिया, इजिप्त,जर्मनी, सिंगापूर, बांगलादेश इत्यादी तर भारतातील केरळ, दिल्ली, आंध्रप्रदेश, प.बंगाल, गोवा, उत्तरप्रदेश, काश्मिर, मुंबई, पुणे, नगर, सोलापूर, औरंगाबाद आदी राज्य आणि शहरातील 340 शॉर्ट फिल्मस पैकी परीक्षकांनी निवडलेल्या 57 शॉर्ट फिल्मस प्रेक्षकांना ऑनलाईन पाहावयास मिळणार आहेत.

पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून ह्या वर्षी सुदिप्तो आचार्य आणि अभिजित देशपांडे हे परीक्षक म्हणून लाभले आहेत.

सुदिप्तो आचार्य हे मुंबई येथील सुभाष घई यांच्या व्हस्टलिंग वूड्स इंटरनॅशनल मुंबई या फिल्म इन्स्टिटयू मध्ये प्रॉफेसर तसेच एफटीआयआय पुणे येथे प्रॉफेसर म्हणून कार्यरत होते.

तसचे दुसरे परीक्षक अभिजित देशपांडे हे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (PIFF) परीक्षक होते, तसेच मामि या मुंबई येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निवड समिती मध्ये होते. ते मुंबई येथील सोमय्या कॉलेज येथे कार्यरत असून चित्रपट संबंधित विविध संस्थांशी निगडित आहेत.

यावेळी फेस्टिव्हलचे क्रिएटिव्ह डायरेक्टर हर्षवर्धन धुतुरे, पी.सी.एम.सी. फिल्म क्लबचे संचालक अविनाश कांबीकर व दत्ता गुंड, फेस्टिव्हलचे प्रमुख मार्गदर्शक पिंपरी चिंचवडचे सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे, पी.सी.एम.सी. फिल्म क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.